पिक विमा मिळण्यासाठी लगेच update पहा

*पिक नुकसानग्रस्त झाले असल्यास विमा भरला असल्यास 72 तासाच्या आत करा पिक विमा क्लेमसाठी अर्ज*

स्थानिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसुचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येणार आहे. या जोखीमेंतर्गत शेताचे क्षेत्र पडलेल्या पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरून, शेत दिर्घकाळ जलमय राहिल्यामुळे पिकाचे नुकसान झाल्याचे निदर्शनास येत असेल तर लागू राहील.

परभणी तालुक्यात आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कं. लि. या विमा कंपनीकडून राबविण्यास मान्यता दिली आहे.त्यानुसार शेतकऱ्यांनी पीकविमा भरून आपले पीक संरक्षित केले. क्षेत्र जलमय झाल्यामुळे(Inandetion / अतिवृष्टीमुळे (Excess Rainfall) शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास त्याअनुषंगाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी *अॅप डाउनलोड करून त्यामध्ये पीकविमा संरक्षण घेतलेल्या पिकांच्या नुकसानीची माहिती स्थानिक आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त फोटोसह अपलोड* करावी
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central

 किंवा

  *14447 या निःशुल्क क्रमांकावर* तक्रार क्लेम हे *72 तासाच्या आत (3दिवसांत) नुकसानीची नोंद करावी.* 

किंवा
शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार नोंदवणे शक्य नाही अशा शेतकऱ्यांनी
*आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीच्या जिल्हा, तालुका कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह* ही तक्रार नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासाच्या(3दिवसांत) आत नुकसानीची नोंद करणे आवश्यक आहे. सध्या पिकांचे नुकसान हे क्षेत्र जलमय झाल्यामुळे(Inandetion / अतिवृष्टीमुळे (Excess Rainfall) पावसामुळे झाले असल्यास जे कारण असेल त्याप्रमाणे कारण नमूद करून नुकसानीची माहिती देणे आवश्यक आहे.
व केलेल्या क्लेम चां Docket ID/ क्लेम नंबर/क्लेम पावती सांभाळून ठेवणे गरजेचे आहे
थोडे नवीन जरा जुने