मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना -पैसे नाही आले तर हे करा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना -पैसे नाही आले तर हे करा

*मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना पैसे संबंधी प्रश्न उत्तर*

१) आमचा फॉर्म अप्रवल झाला तरी पैसे आले नाही व बँक आधारला लिंक असून देखील पैसे खात्यावर जमा झाले नाही 

*उत्तर:- १६ व १७ तारखेपर्यंत राहिलेल्या महिलांना फॉर्म अॅप्रोहल झाला असेल व बँक खाते आधारला लिंक असेल तर पैसे जमा होतील*

२)फॉर्म अप्रुव्हल झाला आहे पण आधारला बँक लिंक नाही तर काय करायचे

*उत्तर:-ज्या बँकेत आपलं खात असेल त्या बँकेत जाऊन आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन NPCI मॅपिंग करून घ्या नाहीतर इंडियन पोस्टल पेमेंट बँक चे खाते ओपन करा*

३) मी फॉर्म भरताना जे खाते दिले होते त्याच्यामध्ये पैसे न जमा होतात दुसऱ्या खात्यामध्ये जमा झाले? 


*उत्तर:-जे तुमच्या आधार कार्डला जे बँक खाते लिंक असेल त्याच खात्यावर पैसे जमा होतात तुम्ही दिलेल्या खात्यावर ते जमा होणार नाही*

४)आधार बँक खाते लिंक आहे ते कसे चेक करायचे

*उत्तर:-आधार कार्ड च्या साईट वरती जाऊन बँक सेटिंग चेक करून घ्या तिथे जे अकाउंट दिसेल ते अकाउंट आधार ला लिंक असेल जर तिथं इन ऍक्टिव्ह किंवा खाते दिसले नाही तर आपले आधार बँक ला लिंक नाही असे समजावे*

*लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नाहीत?*
कारणे

1) आपण ज्या बॅंकेचे खाते दिले आहे, तिथेच पैसे येतील अस नाही, आपल खातं आधारला (NPCI) लिंक असेल त्याच बॅंकेत पैसे मिळणार, खाते NPCI आधार लिंक नसेल तर 17 तारखे अगोदर खाते लिंक करा किंवा पोस्टात खाते उघडून घ्या, खाते उघडताना DBT लिंक करायची आहे सांगायला विसरु नका.
2) आपले खाते लिंक असुनही पैसे मिळाले नसतील तर 17 तारखेपर्यंत पैसे येऊ शकतात, पैसे वाटपाची अजुनही प्रक्रिया सुरुच आहे.
3) कदाचित आपण केलेल्या अर्जाची अजुनही झालेली नसेल तर घाबरु नका, शासनाकडून छाननी प्रक्रिया सुरुच आहे.

थोडे नवीन जरा जुने