पीक विमा 2024

पीक विमा कसा भरावा

नमस्कार मित्रानो, तुम्हाला आज आपण महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत.
तरी सर्व शेतकऱ्यांनी सर्व माहिती वाचावी,तर चला जाणून घेऊया. तुम्हाला तर माहीत आहे की आपले सरकार 1 रुपयात आपला विमा भरून देत आहेत.
तरी त्यासाठी नवीन नियम लागू झाले आहेत.
तरी कोणती नियम लागू झाले आहेत ते खालील सविस्तर दिले आहेत. 

*पिकविमा भरण्यासाठी मार्गदर्शक सुचना*
1)आधारकार्ड वरील नावा प्रमाणे  सातबारा असावी.

2) आधार कार्ड प्रमाणे बँकेच्या पासबुक वर नाव असावे.

3) पासबुक प्रिंटेड असावे.
........................................
 *सातबारा आणि पासबुक आधारकार्ड वरील नाव समान नसेल तर काय करावे* 

1) सध्या पिक विमा अर्ज भरता येईल
2) कमीतकमी पासबुक आणि आधार कार्ड वरचे नाव समान असावे
3) *पिक विमा भरल्यानंतर सातबारा दुरुस्ती साठी तलाठी कार्यालयात अर्ज करणे बंधनकारक आहे.* 

4) *दुरुस्त केलेली सातबारा पिक विमा भरलेल्या ठिकाणी जमा करावी.* 

5) ही दुरुस्त केली सातबारा नंतर अपलोड करावी लागणार आहे

6)निर्धारित वेळेत दूरूस्त केलेली सातबारा पिक विमा भरलेल्या ठिकाणी  नेऊन नाही दिल्यास पिक विमा अर्ज बाद होणार आहे

त्यासाठी शेतकरी स्वतः जबाबदार असेल

सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पिक विमा नाही मिळाल्यास पिक विम्याची पावती घेऊन पिक विमा कार्यालयास  स्वतः शेतकऱ्यांना भेट द्यावी लागेल.
थोडे नवीन जरा जुने